मुंबई आणि नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात रसायनांची व फर्नेस तेलाची चोरी होते. हे तेल अनधिकृतपणे काळ्या बाजारात विकले जाते. त्या चोरेलेल्या तेलाच्या जागी भेसळयुक्त निकृष्ठ दर्जाचे तेल टेन्कर मध्ये भरले जाते. तेल कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. या निकृष्ट भेसळयुक्त तेलामुळे ज्याठिकाणी हे तेल वापरले जाते त्या उद्योगानादेखील उत्पादन कामात नुकसान सहन करावे लागते. हे सर्व राजरोसपणे मुंबई तसेच नवी मुंबई परिसरात होताना दिसत आहे.
हे तेल चोरीचे आणि भेसळीचे प्रकार ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडतात. त्या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कसलाच थांग पत्ता नसतो असा देखावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती काही वेगळीच आहे.पोलिसांना हे अड्डे माहित नसतात . हे पोलिस यंत्रणेचे अपयश म्हणता येईल. पण जेंव्हा सुजाण नागरिक या नात्याने पोलिसांना हा गैरप्रकार निदर्शनास आणून दिले जातो. तेंव्हाही पोलिस त्या माफियांवर कारवाई करण्याऐवजी माहिती देणाऱ्या नागरिकांची उलट तपासणी करतात. त्यामुळे पुन्हा कोणी पोलिसांना आपला मित्र समजून माहिती देण्यास धजावत नाही. असाच प्रकार १२ तारखेच्या पहाटे साकीनाका येथील चांदिवली परिसरात घडला. भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती या संस्थेचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष सुधीर नवले तसेच , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी तेल माफियांचा मुद्देमाल पकडून दिला . चांदिवली गाव , छत्रपति शिवाजी नगर परिसरात ज्या ठिकाणी हा गैरप्रकार सुरु होता. त्याठिकाणी या दोघांनी आपल्या सहकार्यांसह पोहोचून खात्री करून घेतली. त्यानंतर स्थानिक पोलिसांना तशी माहिती दिली. पोलिस मात्र याबाबतीत गंभीर नसल्याचे त्यांना अनुभव आला.
सुधीर नवले यांनी आयुक्तांपासून ते मुंबई पोलिसातील सर्व विभागात प्रमुख पदावर असणारया पोलिस अधिकार्यांना या गैरप्रकाराबद्दल आधीच २-३ दा कळवले होते . तरीही स्थानिक पोलिस ठाण्याला न कळवता तुम्ही घटनास्थळी कसे आलात असा सवाल पोलिसांनी केला . त्या ठीकाणी आलेल्या पोलिस अधिकार्यांनी सुधीर नवले व त्यांच्या सहकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी सगळ्यांची नावे व मोबाइल नंबर लिहून घेतले. खंडणी खोरीच्या गुन्ह्यात सगळ्यांना अडकवण्याची भीती ही दाखवली मात्र सुधीर नवले यांनी या दबावाला बळी न पडता पोलिसांना तेल माफियांवर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय जागेवरून हलणार नाही असे निक्षून सांगितले . तेंव्हा पोलिस निरीक्षक अमित म्हात्रे यांना जागेचा पंचनामा करावाच लागला .मात्र त्यानंतर काय कारवाई झाली याची माहिती मिळू शकली नाही . पोलिसांची या माफियांवर मेहेरनजर आहे हेच यातून दिसून येते अशी खंत सुधीर नवले व जगदीश खांडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
आम्ही मेहराज या माफिया चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे ते तेल कुठून व कसं आलं ? याची चौकशी करत आहोत. संबंधित तेलाची व जागेची कागदपत्रांची तपासणी करत आहोत .
अमित म्हात्रे
पोलिस निरीक्षक , साकीनाका पोलिस ठाणे
असा कोणताही प्रकार घडलेला नाही . या प्रकरणाबद्दल मला काहीच कल्पना नाही .
प्रसन्ना योगीराज मोरे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक , साकीनाका पोलिस ठाणे