अग्निशमन दलातील कर्मचार्‍यांना पदोन्नती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2014

अग्निशमन दलातील कर्मचार्‍यांना पदोन्नती

मुंबई : मुंबई अग्निशमन दलातील कर्मचार्‍यांना १ ऑगस्ट २00१ पासून कालबद्ध पदोन्नतीचा लाभ द्यावा, असे आदेश औद्योगिक न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहे. मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अँड़ प्रकाश देवदास यांनी याबाबतची माहिती दिली. त्याचा फायदा अग्निशमन दलातील अडीच हजारांपेक्षा अधिक कर्मचार्‍यांना होणार आहे. अडीच हजारपेक्षा अधिक कर्मचार्‍यांना गेल्या चार वर्षांतील ११६ कोटी रुपये एवढी थकबाकी मिळणार आहे, असे संघटनेचे अँड़ प्रकाश देवदास यांनी सांगितले. स्थायी समितीने मंजूर केलेल्या ठरावाप्रमाणे अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ १ ऑगस्टपासून देण्याची मागणी मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेने औद्योगिक न्यायालयात केली होती.

Post Bottom Ad