मुंबई - मुंबईत पाच वर्षांच्या तुलनेत यंदा डेंगीमुळे मृतांची संख्या अधिक असून ती दिवसागणिक वाढत चालली आहे; मात्र महापौर स्नेहल आंबेकर यांनी हा रोग गंभीर नसल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत डेंगीने 13 बळी घेतले आहेत.
डेंगी आजाराची काळजी करण्याचे कारण नाही. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये आजारावर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात आल्याची माहिती महापौर आंबेकर यांनी दिली आहे. तापाच्या रुग्णांची संख्या 13 हजार 500 वर पोहोचली आहे. डेंगीपाठोपाठ मलेरियाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मलेरियाच्या रुग्णांची संख्या एक हजार 164 वर पोहोचली आहे. गत वर्षी डेंगीबाधित मृतांची संख्या 12 होती. कुर्ला, प्रभादेवी, दादर, वरळी, एल्फिन्स्टन रोड, भायखळा, उमरखाडी, डोंगरी, मुंबई सेंट्रल, मोहम्मद अली रोड या भागात मोठ्या प्रमाणात डेंगीचे रुग्ण आढळत आहेत. या भागात डेंगी आणि मलेरियाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, तरी त्याचा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिका आणि खासगी रुग्णालयात एक हजाराहून अधिक डेंगीग्रस्त उपचार घेत आहेत.
डेंगीचे मृत्यू
2010 - 3
2011 - 3
2012 - 5
2013 - 12
2014 - 13
डेंगीचे मृत्यू
2010 - 3
2011 - 3
2012 - 5
2013 - 12
2014 - 13