मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील दलित हत्याकांडाचा तातडीने तपास करून दोषींना शासन करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या शिष्टमंडळाला दिले, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी दिली.
जवखेडे गावातील तीन दलितांच्या हत्येचा तपास १७ दिवसांनंतरही लागत नाही. त्यामुळे आठवले यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. पोलिसांना धागेदोरे मिळाले आहेत. या केसचे काम नामवंत वकिलांकडे सोपविण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सहा डिसेंबरपूर्वी सुरू करावे तसेच स्मारकासाठी किमान १00 कोटी रुपयांची तरतूद २0१५-१६ च्या अर्थसंकल्पात करावी, दलित आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पीय तरतूद वाढवावी, दलित अत्याचार प्रतिबंधक समितीची बैठक बोलवा, आंदोलनकारी कार्यकर्त्यांविरुद्धचे खटले काढून घेण्यासंदर्भातील शासन निर्णयाला मुदतवाढ द्या, अशा मागण्याही आपण केल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. आठवले यांनी राजकीय प्रश्नांना उत्तरे देताना आपला केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश नक्की होईल असे आश्वासन अमित शाह यांनी दिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने यापुढे १0 ते १५ वर्षे महाराष्ट्रात सत्तेवर येण्याचे स्वप्न पाहू नये, असेही ते म्हणाले.