मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली लोकल वाढत्या अपघातांमुळे जीवघेणी ठरत आहे. 21 महिन्यांत (1 जानेवारी 2013 ते सप्टेंबर 2014) विविध रेल्वे अपघातांत एकंदर चार हजार 890 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातांत तीन हजार 281 जणांचा; तर एक हजार 513 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. 96 जणांच्या मृत्यूचे कारण समजलेले नाही.
लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात; मात्र त्यांना चांगल्या सोयी-सुविधा मिळत नसल्याचे दिसते. 21 महिन्यांत एक हजार 513 प्रवाशांचा पडून मृत्यू झाला. दररोज सरासरी दोनतीन जणांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. रूळ ओलांडू नका अशा सूचना रेल्वे प्रशासन करीत असते, परंतु त्याकडे प्रवासी दुर्लक्ष करतात. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातांमध्ये सर्वांत जास्त म्हणजे तीन हजार 281 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन हजार 882 पुरुष आणि 399 महिलांचा समावेश आहे. या घटनांची दखल घेऊन लोहमार्ग पोलिसांनी जनजागृतीचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचे रूळ ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाईबरोबरच जनजागृतीसाठी विद्यार्थी आणि सेलिब्रेटींची मदत घेण्यात येणार आहे. अपघातांचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, असे लोहमार्ग रेल्वे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले.
हलगर्जीमुळे 45 प्रवाशांचा; तर रेल्वेच्या हलगर्जीमुळे अन्य 45 जणांचा मृत्यू झाला आहे. फलाटाच्या कमी उंचीमुळे निर्माण झालेल्या पोकळीमुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. 2013 मध्ये मुंबई सेंट्रल स्थानकात सात प्रवाशांचा मृत्यू झाला. दादर, कुर्ला, चर्चगेट, बोरिवली आणि वसई स्थानकातही असे मृत्यू झाले आहेत. जानेवारीत घाटकोपर रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातात मोनिका मोरेला दोन्ही हात गमवावे लागले.
मध्य रेल्वेवरील कुर्ला, ठाणे, कल्याण, डोंबिवली; तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली आणि वसई स्थानकात सर्वाधिक अपघातांची नोंद आहे. कल्याणमध्ये 445, कुर्ल्यात 381, ठाणे 353 आणि बोरिवलीत 325 प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला. कुर्ल्यात 213, बोरिवलीत 149, डोंबिवलीत 144 आणि ठाण्यात 131 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची नोंद आहे.