दलित हत्याकांडा विरोधात गोवंडीमध्ये मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 November 2014

दलित हत्याकांडा विरोधात गोवंडीमध्ये मोर्चा

अहमदनगर येथील जवखेडा खालसा गावात झालेल्या दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ रविवारी सकाळी गोवंडीतील लुंबिनी बागपासून देवनार पोलिस ठाण्यापर्यंत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली. दरम्यान, या हत्याकांडाच्या निषेधार्थ आज, सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे छत्रपती शिवाजी टर्मिनससमोर रास्ता रोको करण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेवक अरुण कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांच्यासह काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारिप बहुजन महासंघ या पक्षांचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, देवनार परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

Post Bottom Ad