कंत्राटी सफाई कामगारांना कायम करावे, या मागणीसाठी राज्याच्या कानाकोप:यातून आलेल्या कामगारांनी बुधवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. सफाईचे काम हे कायमस्वरूपी काम आहे, सफाई ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे 27 टक्के सफाई कामगारांना त्वरित मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत घ्यावे, यासाठी कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली कामगारांनी एल्गार पुकारला आहे.
कचरा वाहतूक श्रमिक संघाचे २००३ साली बाराशे कंत्राटी कामगारांना सेवेत घेतले. पालिकेने या कामगारांविरोधात तीन वेळा उच्च न्यायालयात दाद मागितली; परंतु उच्च न्यायालयाने पालिकेचे मुद्दे मान्य केले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे कामगारांच्या बाजूचे आहेत. यामुळे या निवाडय़ाच्या निष्कर्षावर अंमलबजावणी करण्यास विलंब न लावता कामगारांना पालिका अधिकारी निवाडय़ाचे फायदे देतील, अशी अपेक्षा कचरा वाहतूक श्रमिक संघाचे अध्यक्ष दीपक भालेराव यांनी व्यक्त केली. पालिकेतील सफाई विभागातील अयोग्य, असमर्थनीय कंत्राटी दाखवण्याची पद्धत रद्द करून या कामगारांशी असलेले पालिकेचे मालक-कामगार संबंध मान्य करावे अशी मागणी केली आहे.