प्रजा फाऊंडेशनचा निष्कर्ष
‘सवलतीच्या दरातील घरे’ या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी प्रजा फाऊंडेशनने प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मुंबईतील जमिनीचे वाढलेले भाव, त्यात कमी उत्पन्नामुळे घरखर्च चालविण्यासाठी करावी लागणारी कसरत. यामुळे पिचलेल्या सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे घरांच्या किमती जात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईत घरांची समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याची चिंता व्यक्त केली होती. त्यावर प्रकाश पाडण्यात आला. स्पेशल टाऊनशिप पॉलिसी, क्लस्टर रिडेव्हलपमेंट आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना असे अनेक प्रकल्प सरकारने आणले, मात्र तरीही मुंबईतील नागरिकांच्या घरांची समस्या अद्याप सुटू शकलेली नाही.
ठळक मुद्दे- १९९५ ते २०१४ दरम्यान २,०३,६२४ सार्वजनिक घरे बांधली.
मुंबई - शहरातील २८ लाख कुटुंबांपैकी मुंबईतील ११.३६ लाख कुटुंबे झोपडपट्टीत राहतात. त्यापैकी ५७ टक्के कुटुंबे महाग घरांमुळे एकाच खोलीत राहतात. त्यांच्या वार्षिक खर्चाच्या उत्पन्नापेक्षा घरांचे भाव बारापट महाग असल्याचा निष्कर्ष प्रजा फाऊंडेशनने आजच्या पत्रकार परिषदेत मांडला.
‘सवलतीच्या दरातील घरे’ या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी प्रजा फाऊंडेशनने प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मुंबईतील जमिनीचे वाढलेले भाव, त्यात कमी उत्पन्नामुळे घरखर्च चालविण्यासाठी करावी लागणारी कसरत. यामुळे पिचलेल्या सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे घरांच्या किमती जात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईत घरांची समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याची चिंता व्यक्त केली होती. त्यावर प्रकाश पाडण्यात आला. स्पेशल टाऊनशिप पॉलिसी, क्लस्टर रिडेव्हलपमेंट आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना असे अनेक प्रकल्प सरकारने आणले, मात्र तरीही मुंबईतील नागरिकांच्या घरांची समस्या अद्याप सुटू शकलेली नाही.
अजूनही ५२ लाख मुंबईकर झोपडपट्टीतच राहात आहेत. अनेकजण मुंबईबाहेर राहत असल्याने आणि कामधंद्यानिमित्त मुंबईत येत असल्याने वाहतुकीवर प्रचंड प्रमाणात ताण येत आहे. त्यामुळे त्यांना त्यांंच्या राहत्या परिसरातच कामधंद्याची सोय केल्यास काही प्रमाणात घरांच्या किमती आवाक्यात येऊ शकतात. पोर्ट ट्रस्ट किंवा मिठागरांच्या जमिनींचा विकास केल्यास सर्वसामान्यांना परवडणार्या घरांचा प्रश्न मिटू शकतो. यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी ‘गृहनिर्माण, एफएसआय, निवासी गर्दी आणि घनता’ ही माहिती पुस्तिका यावेळी प्रकाशित करण्यात आली.
ठळक मुद्दे- १९९५ ते २०१४ दरम्यान २,०३,६२४ सार्वजनिक घरे बांधली.
- २८ लाख कुटुंबांपैकी मुंबईतील ११.३६ लाख कुटुंबे झोपडपट्टीत.
- ५७ टक्के कुटुंबे एकाच खोलीत राहतात.
- ८ टक्के कुटुंबांना एकही खोली नाही.
- २६९ चौ. फूट घराची सरासरी किमत उत्पन्नाच्या बारापट महाग.