मुंबई : २0११च्या जनगणनेनुसार १.२ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या अवधीत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना केवळ २३ जणांना दंड ठोठावल्याची माहिती पुढे आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही आकडेवारी उघड केली आहे.
एफडीएच्या अधिकार्यांनी गेल्या सात महिन्यांत मुंबई शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्यांकडून दंडाच्या रुपात ३९00 रुपये गोळा केले, तर राज्यभरात ४८८ लोकांकडून ५५,३१३ रुपयांचा दंड गोळा करण्यात आला. मुंबईच्या तुलनेत कमी लोकसंख्या असलेल्या अमरावती आणि नागपूर शहरात धूम्रपानाच्या गुन्ह्यासाठी दंड ठोठावण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या अधिक आहे. अमरावतीमध्ये १३९, तर नागपुरात १२९ लोकांना दंड ठोठावण्यात आला. 'टाटा मेमोरिअल हॉस्पिटल'कडील आकडेवारीनुसार, मुंबईत २0१0 मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ७५८ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
धूम्रपान हे फुप्फुसाच्या कर्करोगामागील प्रमुख कारण मानले जाते. सिगारेट तसेच अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा, २00३च्या कलम ४ अन्वये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्यांना दंड ठोठावण्याचा २१ यंत्रणांना अधिकार आहे. त्यात शाळा प्राचार्य, स्टेशन मास्तर, हॉस्पिटलचे अधिष्ठाता, सरकारी संस्थांचे प्रमुख आदींचा समावेश आहे. याच कायद्याच्या कलम ६ अन्वये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्याकडून २00 रुपयांपर्यंत दंड आकारणी केली जाऊ शकते.