मुंबई : बेस्ट उपक्रमाचा २0१५-१६ या वर्षाचा अर्थसंकल्प आणि दोन रुपये भाडेवाढीला गुरुवारी बेस्ट समितीमध्ये बहुमताने मंजुरी देण्यात आली. भाडेवाढ दोन टप्प्यांत म्हणजे फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये करण्यात येणार आहे. मात्र, पालिकेच्या स्थायी समितीने बेस्टला १५0 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केल्यास मुंबईकरांना फक्त एक रुपयाच्या दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
बेस्ट उपक्रमाचा २0१५-१६ या आर्थिक वर्षासाठीचा ७१८५.५६ कोटी रुपयांचा आणि ९४६.३२ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प बेस्टमध्ये सादर केला होता. त्यावर तीन दिवस चर्चा करण्यात आली. त्यावर मतदान घेण्यात आले आणि बहुमताने अर्थसंकल्प संमत करण्यात आला. मनसे आणि काँग्रेसने बेस्ट भाडेवाढीचे कारण देत अर्थसंकल्पाच्या विरोधात मतदान केले. २00९-२0१0 मध्ये आस्थापना खर्च ८१३ कोटी रुपये खर्च झाला. मात्र वेतनानंतर २0१३-१४ मध्ये आस्थापना खर्च दीड हजार कोटी खर्च झाला. हा खर्च दुप्पट वाढल्यामुळे कामगारांना बोनस देता येत नाही, ९0 टक्के खर्च आस्थापनावर होत असताना सानुग्रह अनुदानावर अजून पाच टक्के खर्च करणे संयुक्तिक नसल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता म्हणाले.

महापालिकेने गेल्या वर्षी बेस्टला १५0 कोटी रुपये दिले होते. त्यापैकी ३७ कोटी ५0 लाख रुपये बेस्टला मिळाले होते. ३७ कोटी ५0 लाखांचा दुसरा हप्ता शुक्रवारी सायंकाळी बेस्टला देण्यात येणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले. बेस्टला अर्थसहाय्य करण्यासाठी क्रुड ऑईलवर कर लावण्यात येणार असल्याची माहिती फणसे यांनी दिली.