मानखुर्द विकास संघर्ष परिषदेची तक्रार
मानखुर्द \ रशिद इनामदार \ JPN NEWS - http://jpnnews.webs.com
मानखुर्द पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मंडाळा बिट च्या पोलिसांमुळे नागरिक त्रस्त आहेत .या बीट मधील पोलिस अधिकारी गुन्हेगारांची पाठराखण करून गरीब नागरिकांना छळत आहेत अशी माहिती समोर आली आहे . मानखुर्द विकास संघर्ष परिषदेच्या वतीने अध्यक्ष विश्वास यशवंतराव मेंगे यांनी लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीची प्रत त्यांनी पोलिस आयुक्तालय ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पोलिस उपयुक्त , सहाय्यक पोलिस उपायुक्त ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानखुर्द पोलिस ठाणे यांना पाठवली आहे . तक्रार करून जवळ एक महिन्याचा कालावधी लोटला तरी आजवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे विश्वास मेंगे यांनी सांगितले.
तक्रारीमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय कावळे , हवालदार बाबाजी मुजावर आणि फौजदार प्रकाश जावीर यांचा स्पष्ट उल्लेख असूनदेखील त्यांच्याविरोधात कारवाई केली नसल्याचे मेंगे यांचे म्हणणे आहे . अनधिकृत बांधकामे बांधणाऱ्या भूमाफियांना अभय देऊन गरिबांच्या झोपड्यांची दुरुस्ती सुरु असेल तर त्यांना नाहक त्रास देतात. गरिबांच्या झोपड्या सुरक्षित राहण्यासाठी हे पोलिस अधिकारी प्रत्येक झोपडीमागे दीड ते तीन लाख रुपये मागतात. पैसे देण्यास झोपडी मालक इतके पैसे देऊ शकला नाहीतर त्याला अटक करतात. कोणत्याही गुन्ह्याशिवाय डांबून ठेवतात किंवा खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना बदनाम करतात.शिवनेरी नगर परिसरात अशाच प्रकारे पैसे न मिळाल्यामुळे या अधिकारायानी महानगर पालिका अतिक्रमण विरोधी विभागाला किंवा कलेक्टर ला कारवाई ची सूचना न देता स्वतः च गरिबांच्या ४ - ५ झोपड्या उध्वस्त करून त्यांचे संसार उघड्यावर आणले आहेत. अशी गुंडगिरी करून बाबाजी मुजावर आपल्या ही दोन झोपड्या या परिसरात बांधल्या आहेत.
जुगारी अड्डे , अनधिकृत बांधकाम करणारे व्यासायिक तसेच परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या मंडळीना संरक्षण पुरवून अन्यायाविरुद्ध वाचा फोडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मात्र खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे प्रयत्न हे पोलिस अधिकारी करत असतात . या त्रासाची पर्वा न करता मानखुर्द विकास संघर्ष परिषदेच्या अध्यक्षांनी लेखी तक्रार केली होती. संबंधित अधिकारी तसेच परीसरातील गुंडप्रवृत्तीच्या लोकांची नावे व आवश्यक माहिती दिली होती परंतु आजवर या प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नाही. असा आरोप ही मानखुर्द विकास संघर्ष परिषदेचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी करत आहेत.
आम्हाला अर्ज मिळाल्यापासून आम्ही प्रकरणाची चौकशी करीत आहोत. पोलिस निरीक्षक चांदेकर यांच्यावर चौकशी ची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आजवरच्या तपासात आरोप सिद्ध होतील असे काही आढळलेले नाही. अर्जदार संस्थेने या प्रकरणाबद्दल आवश्यक ते साक्षी पुरावे देणे आवश्यक होते. ते त्यांनी दिलेले नाहीत अथवा अर्ज दिल्यापासून आमच्याशी कसलाही संपर्क साधून प्रकरणाबद्दल चर्चा केलेली नाही. तरीही आम्ही गंभीरपणे आणि निष्पक्ष चौकशी करीत आहोत. दरवेळी महापालिका तसेच कलेक्टर यांचे अनधिकृत बांधकामविरोधी पथकाला दरवेळी कारवाई शक्य नसते. त्यामुळे अशी अनधिकृत बांधकामे रोखणे पोलिसांचे कर्तव्य आहे. आम्ही दोन्ही खात्यांना अनधिकृत बांधकामांबद्दल कळवले आहे .
विलास कानडे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक , मानखुर्द पोलिस ठाणे