फसव्या जाहिरातींवर आता कारवाई होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 November 2014

फसव्या जाहिरातींवर आता कारवाई होणार

मुंबई - सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी ऍडव्हर्टायझिंग स्टॅंडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात ऍस्की या मध्यवर्ती संस्थेने काही नियम केले आहेत. या नियमांचे पालन करतानाच, जाहिरातींमध्ये स्व-नियमन करण्याचे ध्येय बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाने (डीओसीए) ऍस्कीशी अधिकृत करार केला आहे. 


या करारांतर्गत जाहिरातींसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये शेती आणि खाद्य, आरोग्य, शिक्षण, घरबांधणी, आर्थिक सेवा, ई-कॉमर्स या सहा क्षेत्रांतील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर ही कारवाई होणार आहे. ग्राहक व्यवहार विभाग त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारी ऍस्कीकडे पाठवणार आहे, ज्यामुळे ऍस्कीकडे आधीपासून असलेल्या तक्रारी व त्यावरच्या प्रक्रियेची पुनरावृत्ती होणार नाही. प्रिंट, पॅकेजिंग, इंटरनेट, बाहेरच्या जाहिराती, भित्तिपत्रके, पोस्टर्स आणि बिल बोर्डच्या माध्यमांतून तक्रारींचे मूल्यांकन केले जाणार आहे.
डीओसीएचे अतिरिक्त सचिव जी. गुरुचरण यांच्या मते, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि पर्यायाने व्यवसायांच्या अयोग्य पद्धतींची व्याप्ती वाढली आहे. सर्वच क्षेत्रे, माध्यमांमध्ये अशी उदाहरणे दिसून येत आहेत. त्यांच्याविरोधात ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी डीओसीएने ऍस्कीबरोबर केलेली भागीदारी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Post Bottom Ad