मुंबई : मुंबईत डेंग्यूचा प्रभाव वाढल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला असून ६२0 रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पालिकेने डेंग्यू आणि हिवतापाच्या उत्पत्तीची २ हजार ४६२ स्थाने नष्ट केली आहेत. डेंग्यू आणि हिवतापाच्या डासांची उत्पत्ती स्थाने आढळल्यामुळे १३ हजार २१५ ठिकाणी कायदेशीर कारवाई केली आहे, असा दावा पालिकेच्या कीटकनाशक विभागाने केला आहे.
डेंग्यू आणि हिवताप पसरवणार्या डासांची उत्पत्ती झाल्याचे आढळले, तर पालिकेच्या अधिनियमातील तरतूदीनुसार ज्या व्यक्ती व संस्था प्रतिबंधक उपाययोजना अमलात आणत नसतील अथवा त्यांच्या घरी आणि परिसरात डासांची उत्पत्ती झाल्याचे आढळल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येते. पालिकेने ऑक्टोबर २0१४ पर्यंत १३ हजार २१५ ठिकाणी कायदेशीर कारवाई केली आहे. घरातील आणि घराबाहेरील पाण्याच्या पिंपामध्ये आरोग्य केंद्रातील स्वयंसेविकांद्वारे आणि स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांद्वारे टेमिफॉस या अळी नाशकाचा वापर करण्यात येतो. पालिकेने डेंग्यू आजार पसरवणार्या डासांची एक हजार २८२ उत्पत्ती स्थाने सप्टेंबर २0१४ मध्ये तर एक हजार १८0 स्थाने ऑक्टोबरमध्ये नष्ट केली आहेत, असेही किटकनाशक विभागाने म्हटले आहे
हिवताप रोखण्यासाठी पालिकेने साप्ताहिक कृती आराखडा त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सध्या मुंबईत २ हजार ६४४ बांधकामे सुरू आहेत. हिवताप रोखण्यासाठी सर्व कडक उपाययोजना करण्याच्या आणि विकासकांनी बांधकाम कामगारांना कीटकनाशक भारीत मच्छरदाण्या पुरवणे व त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशाही सूचना पालिकेने दिल्या आहेत. डास निर्मूलनासाठी पाण्याचे मोठे साठे, उघड्या विहिरी अशा ४ हजार ७४४ ठिकाणी गप्पी मासे सोडले असून पालिकेच्या मालमत्तेतही सात हजार १९२ टाक्यांपैकी ६ हजार ८६५ टाक्या डास प्रतिबंधक केल्या आहेत. झोपडपट्टी, संवेदनशील विभाग केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या तसेच खाजगी बंद गिरण्या येथेही साप्ताहिक डास नियंत्रण कारवाई करण्यात येत आहे. सर्व माध्यमांमार्फत यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे, असा पालिकेचा दावा आहे.