बालदिना निमित्‍त बच्‍चे कंपनी लुटणार सर्कसचा आनंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2014

बालदिना निमित्‍त बच्‍चे कंपनी लुटणार सर्कसचा आनंद

मुंबईदि. 13 – बालदिनाचे औचित्‍य साधून वांद्रे येथील मुलांसाठी मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍यातर्फे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात रेनबो सर्कसचा खास शो आयोजित करण्‍यात आला आहे. वांद्रे पश्चिम येथील म्‍हाडा ग्राऊंड क्रमांक दोनवर दुपारी साडे तीन वाजता सर्कसचा खास शो होणार असून यावेळी सुमारे पाचशेहून अधिक मुलांना मोफत सर्कस पहायची संधी उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. यावेळी आमदार आशिष शेलार यांच्‍यासह खासदार पुनम महाजनही उपस्थित राहणार आहेत.

Post Bottom Ad