केईएमच्या कर्मचाऱ्यांची हाताची घडी, तोंडावर बोट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2014

केईएमच्या कर्मचाऱ्यांची हाताची घडी, तोंडावर बोट

वडाळा - डेंगीची लागण झाल्याने येथील केईएम रुग्णालयातील दोन डॉक्‍टरांचा, तर रुग्णालयात डेंगीवर उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर या रुग्णालयात अस्वच्छता असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आता केईएममधील अस्वच्छतेच्या आणखी बातम्या येऊ नयेत यासाठी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना माहिती उघड न करण्याची तंबी दिली आहे. 


अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी अंतर्गत बैठक बोलावून रुग्णालयातील सुरक्षा वाढवण्यावर भर दिल्याचे समजते. यात अतिदक्षता विभागापासून सामान्य वॉर्डात विनाकारण घुटमळणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. शिवाय डेंगीबाबत कुणीही बाहेर वाच्यता करू नये, असा आदेशही देण्यात आला आहे. आता केईएममध्ये जाणाऱ्यांवर या कर्मचाऱ्यांकडून प्रश्‍नांची सरबत्ती होत आहे. ही तटबंदी भेदूनच रुग्णालयात जाता येत आहे. डेंगीमुळे होणारी रुग्णालयाची बदनामी टाळण्यासाठी येथील सर्व डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना येथील माहिती उघड करू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. डेंगीची बातमी ज्या विभागातून फुटेल त्या विभागप्रमुखांना नोटिसा काढण्याचे आदेश डॉ. पारकर यांनी दिले आहेत. 

Post Bottom Ad