रिपब्लिकन कार्यकर्त्यांची विधान भवनासमोर निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2014

रिपब्लिकन कार्यकर्त्यांची विधान भवनासमोर निदर्शने

मुंबई - जवखेडे खालसा येथे दलित कुटुंबातील तीन सदस्यांच्या हत्याकांडातील आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पॅंथर ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनासमोर आंदोलन केले. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी 19 कार्यकर्त्यांना अटक केली. 


विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सोमवारपासून सुरवात झाली. या पार्श्‍वभूमीवर जवखेडे खालसा गावात जाधव कुटुंबातील तिघांच्या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. विधान भवनासमोर दुपारी एक वाजता रिपब्लिकन पॅंथर्स ऑफ इंडिया संघटनेचे प्रमुख सचिन खरात यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. आरोपींना अटक करा, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक करा, अशा घोषणा देण्यात आल्या. विधान भवनाच्या परिसरात जमावबंदी असल्यामुळे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी खरात यांच्यासह 19 कार्यकर्त्यांना अटक केली.

Post Bottom Ad