मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई मध्ये डेंगूने थैमान घातले आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयातील महिला डॉक्टर श्रुती खोबरागडे हिचा मृत्यू डेंगू मुळे झाला असताना अजून एका मुंबई महानगर पालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा शनिवारी मृत्यू झाला आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागात शिपाई म्हणून काम करणारे संदिप गायकवाड ( ३३ ) यांना डेंगू या रोगाची लागण झाली होती. त्यांना मागच्या शनिवारी २५ ऑक्टोबरला पालिकेच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जवळ पास आठवडाभर त्यांच्यावर उपचार करण्यात आले परंतू शनिवारी त्यांचे रुग्णालयात निधन झाले. पालिकेच्या चेंबूर येथील एम वार्डच्या जवळच असलेल्या गांधी मैदान येथील साईनाथ इमारतीमध्ये गायकवाड राहायला होते.
पालिकेने डेंगूच्या अळ्या सापडल्यास अटक करण्याचा फतवा काढला आहे. पालिकेने असा फतवा काढला असताना पालिकेच्याच एम वार्डच्या कार्यालाजवळ डेंगू मुळे एका पालिकेच्याच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने पालिकेच्या डेंगू विरोधी मोहिमेबाबत शंका घेतली जात आहे. मुंबई मध्ये अद्याप पालिकेच्या आकडेवारी नुसार ६२० डेंगूचे रुग्ण मिळाले असून त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. गायकवाड यांच्या मृत्यू मुळे डेंगूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ७ झाली आहे.