मुंबई - नगर जिल्ह्यातील जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ 28 नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार बुधवारी रामदास आठवले यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सत्तेत वाटा न मिळाल्यामुळे सरकारच्या विरोधात हा मोर्चा आहे का, असे विचारल्यावर "कॉंग्रेसच्या सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री असताना नामांतराच्या प्रश्नावर सरकारविरोधात आम्ही मोर्चे काढत होतो,‘ असे उत्तर त्यांनी दिले.
जवखेडा हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे द्यावा, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम 5 डिसेंबरपूर्वी सुरू करावे; अन्यथा इंदू मिलचा ताबा घेऊन आंबेडकरी अनुयायांच्या मदतीने आम्ही स्मारक उभारू, असे आठवले म्हणाले. इंदू मिलच्या साडेबारा एकर जमिनीवर तयार करण्यात येणाऱ्या स्मारकाचे काम दोन वर्षे उलटून गेली, तरी जमिनीचे हस्तांतर सुरू झालेले नाही. हस्तांतर विधेयक संसदेत त्वरित मंजूर करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. या मोर्चात राज्यभरातील आंबेडकरी अनुयायी सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.

हा मोर्चा म्हणजे आठवले यांचे सरकारविरोधात शक्तिप्रदर्शन असेल काय, या प्रश्नावर ते म्हणाले, की आम्ही आमचे प्रश्न घेऊन नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहोत. भाजपसोबत असलो म्हणून काय झाले? शिवसेनेसोबत न गेल्याने काहीही नुकसान झाले नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.