एममित्रा’ 10 लाख गर्भवती स्त्रियांपर्यंत पोहोचणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 November 2014

एममित्रा’ 10 लाख गर्भवती स्त्रियांपर्यंत पोहोचणार

"अरमानची" मोबाईल जनजागृती मोहीम 
Displaying IMG_3745.JPG
मुंबई \मुकेश धावडे \  JPN NEWS - http://jpnnews.webs.com
शहरी भागातील गरीब गर्भवतीस्त्रिया आणि नवजात बालकांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करणा-या एममित्रा व्हाइस कॉल सेवेचा विस्तार करण्याची घोषणा स्वयंसेवी संस्था अरमान आणि एमएएमए यांनी गुरुवारी मुंबईमध्ये केली. विविध शहरांतील 10 लाख गरीब स्त्रियांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून मुंबई आणि इतर शहरांमध्ये या सेवेचा विस्तार आणि विकासकरण्यासाठी ‘अरमान’ने ‘मोबाइल अलायन्स फॉर मॅटर्नल अॅक्शन (एमएएमए)शी सहकार्य करार केला आहे.यावेळी आरोग्य सचिव डॉ. सुजातासोनी, डॉ. अश्विनीभालेराव-गांधी,डॉ. राजीव टंडन, क्रिस्टन ग्यगनेरे,डॉ.प्रेरणा कुमार,कोलिन हॉनकोक आदि मान्यवर उपस्थित होते. 


या सेवेमधून मोबाइलद्वारे महानगरपालिका आणि सरकारी हॉस्पिटल्सआणि स्वयंसेवी संस्थांमार्फत नोंदणी केलेल्या स्त्रियांना त्यांच्या भाषेत आठवडयातून एकदाकिंवा दोनदा त्यांच्यागर्भारपणाची स्थिती किंवा मुलांचे वय याविषयी मोफत मार्गदर्शन केले जाते. प्रायोगिकतत्त्वावर मुंबईतील 3500 सित्रयांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाल्यानंतर 10 लाख स्त्रियांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबईतील झोपडपट्टया आणि महानगरपालिकेतील रुग्णालयांत एममित्राची विस्तारित अंमलबजावणी करताना आम्हाला ‘एमएएमए’सोबत काम करण्याचाफायदा होत असल्याचे अरमानच्या संस्थापक डॉ. अपर्णा हेगडे यांनी सांगितले. भारतामध्ये मोबाइल फोनचे जाळे सर्वदूर पसरलेले असून ते दिवसेंदिवस विस्तारत आहे. यामुळे ग्रामीण भागात आरोग्यविषयक माहिती पुरवण्यासाठी याशिवाय चांगले दुसरे माध्यम नसून ‘एममित्रा’सह एमएएमए पहिल्यांदाच कार्यरत होत असून पहिल्यातीन वर्षात मुंबईत पाच लाख स्त्रियांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य असल्याचे एमएएमए इंडियाचे संचालक डॉ. आकाश गांजू यांनी सांगितले.

एमएएमए बद्दल मोबाईल अलायन्स फॉर म्याटर्नल एक्शन (एमएएमए)तर्फे मोबाईल फोनवर विकसनसिल देशांमध्ये गरीबीत राहणाऱ्यानव्या आणि भावी मातांसाठी आरोग्यविषयक महत्वाची माहितीदिली जाते. युनायटेड नेसन्स फाऊडेशनचाप्रकल्प असलेल्या एमएएमएमध्ये वय आणि टप्यानुसार आरोग्यविषयकमेसेज सेवा दिली जाते. ज्यामुळे स्रिया त्यांच्या व कुटुंबाच्या हिताचे निर्णय सक्षम होतात.2011मध्ये तेव्हाच्या राज्य सचिव हिलरी क्लिंटन यांच्याहस्ते हि सेवा सुरु करण्यात आली होती.

Post Bottom Ad