मुंबई : सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो साडेचार रुपयांची वाढ झाल्यामुळे बेस्टला महिन्याला सुमारे २ कोटी ५0 लाख रुपयांचा तर वार्षिक सुमारे ३0 कोटी २४ लाख रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
बेस्टने डिझेल बसपेक्षा सीएनजी बस खरेदीवर भर दिला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यातील सुमारे ४ हजार १00 बसपैकी सीएनजीवर धावणार्या बसची संख्या २ हजार ९७0 इतकी आहे. या बससाठी प्रति महिना ५६ लाख १ हजार २५८ किलो ग्रॅम इतका सीएनजी गॅस लागतो. बेस्टच्या बसमध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी महानगर गॅस (एमजीएल) या कंपनीकडून प्रति किलो गॅससाठी ७0 पैसे सूट देण्यात येते. मुंबईमध्ये १ नोव्हेंबरपासून सीएनजीची दरवाढ झालेली आहे. सीएनजीची दरवाढ ही ३८ रुपये ९५ पैशांवरून थेट ४३ रुपये ४५ पैशांवर झाली आहे. यावर बेस्टला ७0 पैसे प्रति किलो सूट मिळणार असल्यामुळे ४२ रुपये ७५ पैशांनी सीएनजी उपलब्ध होत असल्याचे बेस्टच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
सीएनजीच्या दरवाढीमुळे प्रति किलो ४ रुपये ५0 पैशांचा अतिरिक्त आर्थिक भार बेस्टला सोसावा लागणार आहे. या वाढीमुळे महिना २ कोटी ५२ लाख ५ हजार ६६५ रुपये इतका अतिरिक्त खर्च बेस्टला येणार आहे. सीएनजी दरवाढीमुळे बेस्टला मोजाव्या लागणार्या जादा रकमेबद्दल मंगळवारी बेस्ट समितीत माहिती देण्यात आली.