मुंबई : मुंबईकरांची सेकण्ड लाईफ लाईन असणार्या बेस्टच्या बसेस या अत्यंत खिळखिळय़ा झालेल्या आहेत. अशा खिळखिळय़ा झालेल्या ३00 जुनाट गाड्या येत्या दोन वर्षांत भंगारात जाणार आहेत. त्याजागी येत्या दोन वर्षांत ३५0 नव्या कोर्या गाड्या विकत घेण्यात येणार आहेत. या ३५0 नव्या गाड्या दोन टप्प्यांमध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत. या गाड्यांची निविदा प्रक्रिया येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
बेस्टच्या ताफ्यातील एकूण ४२00 बसेसपैकी ३00 गाड्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. रस्त्यावरील खड्डे आणि १५ वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान यामुळे या गाड्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत अशा ११९ गाड्या आणि नंतर २0१६ पर्यंत १८0 बसेस बेस्टच्या ताफ्यातून हद्दपार होणार आहेत. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात २९९ गाड्यांची कमतरता भासणार आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी बेस्ट प्रशासन ३५0 नव्या कोर्या बसेस विकत घेण्याचा विचार करत आहे. प्रत्येक बसची किंमत सुमारे ४0 ते ४५ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेस्टवर १४0 ते १६0 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

यूटीएस या केंद्रीय संस्थेतर्फे बस बांधणीचे काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषानुसार बसचा सांगाडा लोखंडाचा असणे आवश्यक आहे. मात्र, बेस्टने मुंबईच्या वातावरणाचा विचार करून लोखंडी सांगाड्याला विरोध केला आहे. मुंबईला समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे खारी हवा असल्याने लोखंडाचे सांगाडे लवकर गंजतात. त्यामुळे लोखंडाऐवजी अँल्युमिनियमचा वापर करण्यात यावा, असे सुचवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बसचा पृष्ठभागही लाकडाऐवजी अँल्युमिनियमचा असावा, अशीही सूचना करण्यात आली आहे.