KYCच्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास बॅंक अकाउंट बंद केले जाणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2014

KYCच्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास बॅंक अकाउंट बंद केले जाणार

मुंबई- वारंवार सूचना दिल्यानंतरही बॅंक खातेदारांनी केवायसीच्या (खातेदाराची पूर्ण माहिती) कागदपत्रांची पूर्तता केली नसेल तर अशा खातेदारांचे बॅंक अकाउंट सहा महिन्यांत बंद केले जाणार आहे. बॅंक खातेदारांना केवायसीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) म्हटले आहे. 
केवायसीची कागदपत्रे संबंधित बॅंकेत जमा न करणार्‍या ग्राहकांचे खाते बंद सुरुवातीला तात्पुरत्या आणि नंतर कायमस्वरुपी बंद करण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने दिले आहेत. ज्या खातेदारांनी बॅंकेने वारंवार सूचना देऊनही आवश्यक ती कागदपत्रे बॅंकेत जमा केले नसतील, अशा खातेदारांना नोटिस बजावली जाणार आहे. नोटीस बजावल्यानंतरही खातेदाराने आवश्यक कागदपत्रे बॅंकेत न जमा केल्यास खातेदाराचे बॅंक खाते  सहा महिन्यांत टप्प्याटप्याने बंद करण्यात येणार आहे.  आरबीआयने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे.

बॅंकेद्वारा खातेदारांना वारंवार केवायसीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही काही खातेदारांनी आपली माहिती बॅंकेत जमा केलेली नाही. अशा खातेदारांचे बॅंक खाते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
ग्राहकांचे खाते बंद करण्यापूर्वी संबंधित खातेदाराला तीन महिन्यांची नोटीस दिली जाणार आहे. तरीदेखील खातेदारांनी कागदपत्राची पूर्तता केली नसेल तर पुढील तीन महिन्यात त्याचे खाते बंद करावे, असे न‍िर्देश आरबीआयने दिले आहेत.

Post Bottom Ad