मुंबईत डेंगीचा पाचवा बळी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2014

मुंबईत डेंगीचा पाचवा बळी

मुंबई - वाळकेश्‍वर येथील महिलेचा शुक्रवारी जसलोक रुग्णालयात डेंगीने मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील डेंगीच्या बळींची संख्या पाच झाली आहे. महिनाभरापासून मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक नागरिक डेंगीने आजारी आहेत. महापालिकेने मलेरियावर नियंत्रण मिळविले असले, तरी डेंगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. ऑक्‍टोबरमध्ये डेंगीच्या रुग्णांत मोठी वाढ झाली. पहिल्याच आठवड्यात शहरात 41 रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबरमध्ये हा आकडा 167 होता. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आढळणारे डेंगीचे रुग्ण डेन -2 प्रकारचे आहेत. या रुग्णांमध्ये कॉम्प्लिकेशन्स झाल्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईप्रमाणेच नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे या शहरांमध्येही डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. राज्यात एकूण 3500 डेंगीचे रुग्ण आढळले. त्यापैकी 24 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. 

Post Bottom Ad