याचिकेवरील सुनावणी निवडणुकीनंतर घेण्याची विनंती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2014

याचिकेवरील सुनावणी निवडणुकीनंतर घेण्याची विनंती

मुंबई - मागील विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याच्या आरोपाचा तपास करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाविरोधात माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी निवडणुकीनंतर घ्यावी, अशी विनंती बुधवारी आव्हाड यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली. 


आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहिती चुकीची होती, असा आरोप करणारी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी केली आहे. वादग्रस्त आदर्श सोसायटीत सदनिका असल्याचा तपशील आव्हाड यांनी प्रतिज्ञापत्रात दिला नाही, असा आरोप वाटेगावकर यांनी केला आहे. ठाणे न्यायालयाने या आरोपांचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. याविरोधात आव्हाड यांनी केलेल्या याचिकेवर न्या. एम. एल. टहलियानी यांच्यासमोर सुनावणी झाली.
सध्या निवडणूक असल्यामुळे याचिकेवर निवडणुकीनंतर सुनावणी घ्यावी, अशी विनंती आव्हाड यांच्या वतीने ऍड्‌. सुहास ओक यांनी केली; मात्र वाटेगावकर यांनी याला विरोध केला. आव्हाड यांना पोलिसांकडे चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते; मात्र त्यांनी न्यायालयात याचिका केली. त्यामुळे याचिकेवर सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद वाटेगावकर यांनी केला. याचिकेवर पुढील सुनावणी 7 ऑक्‍टोबरला होणार आहे.

Post Bottom Ad