कचरामुक्त भारतासाठी स्वच्छ भारत अभियाना राबवले जात आहे. त्याच प्रमाणे मनुवादी संस्कृती, जाती जाती मध्ये असलेला भेदभाव आणी दलितांची हत्याकांडे थांबवण्याची गरज असल्याचे मत आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस आणि पिस ( अेसीजेपी ) या संघटनेचे एन. के. सोनार यांनी व्यक्त केले. दलितांचे हत्याकांड आणि दलितांवर होणारे अन्याय अत्याचार न थांबवल्यास येणाऱ्या काळात अेसीजेपीराज्य आणि केंद्र सरकारला न्यायालयात खेचेल असा इशारा सोनार यांनी दिला. ते पाथर्डी येथे झालेल्या दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या मुंबईच्या आज़ाद मैदान येथील निषेध सभेत बोलत होते.
आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस आणि पिस, बहुजन विकास संघ, धम्म विकास संघ, फ्याम, ऋणानुबंध अभियान, विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने शनिवारी आझाद मैदानात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले हिते.यावेळी बोलताना बॉम्ब स्फोट झाल्यावर, एखाद्या शाखाप्रमुखाची हत्या झाल्यावर संबंधित विभागाच्या पोलिसांना निलंबित केले जाते मग पाथर्डी गावात तिघा दलितांचे खून झाले तरी पोलिसांवर कारवाही का केली जात नाही असा प्रश्न सोनार यानि उपस्थित केला.
पाथर्डी मध्ये घडलेला प्रकार फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारा नाही. तालिबान पेक्षा क्रूर पणे पाथर्डीमध्ये जाधव कुटुंबाची हत्या केली असल्याने महाराष्ट्राचे नाक कापले गेले असल्याचे सोनार यांनी सांगितले. पाथर्डी येथील जाधव कुटुंबीयांच्या खुनाचा तपास सिबिआयकड़े सोपवावा. अट्रोसिटी गुन्ह्या खाली गुन्हा नोंदवावा व दोषी लोकांवर कारवाई करावी. न्यायालयात अट्रोसिटीचे 10 हजार खटले न्यायालयात तर 5 हजार खटले पोलिस ठाण्यामध्ये प्रलंबित आहेत. हे सर्व खटले त्वरित निकाली काढावेत. जाधव कुटुंबियांची हत्या करणाऱ्यांना अद्याप अटक झाली नसल्याने संबंधिताना त्वरित अटक करावी. अहमदनगरचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक याना निलंबित करावे अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दरम्यान या निषेध सभेनंतर विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांची भेट घेवून निवेदन सदर केले. यावेळी सुधाकर सुराडकर, उर्मिला पवार, मिलिंद सुर्वे, योगेश वऱ्हाडे, किशोर कांबळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.