मुंबई : महाराष्ट्रातील शिवसेना भाजपची महायुती तुटल्यानंतर सेना आणि भाजपमधील भांडणे वाढतच चालल्याचे दिसत आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये भाजपा आक्रमक भूमिका घेत असतानाच शिवसेनेनेही भाजपची कोंडी करण्यास सुरवात केली आहे.
पालिका शाळेतील विध्यार्थ्यांना सुगंधी दुध देण्यात येत होते. परंतु या दुधातून विध्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने पालिका शाळांमधून दुध देण्याचे बंध करण्यात आले. विध्यार्थ्यांना सुगंधी दुधच्या एवजी चिक्की देण्याचे आश्वासन महायुतीने दिले परंतु शैक्षणिक वर्षाचे अर्धे वर्ष उलटले तरी विद्यार्थ्यांना चिक्की देता आलेली नाही.
पालिकेतील शिक्षण समिती भारतीय जनता पार्टीकडे आहे. भाजपा ने महायुती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर आक्रमक होणार असे जाहीर केले होते. त्याआधीच सेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचे डाव सुरु केले आहेत. विद्यार्थ्यांना चिक्की मिळत नाही, ती कधी मिळणार असे प्रश्न सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी समितीत उपस्थित केला. तृष्णा विश्वास राव यांनी उपस्थित हरकतीच्या मुद्द्याला सर्वच पक्षाने पाठींबा दिल्याने हरकतीचा ठेवण्यात आला . त्यामुळे महायुतीच्या फुटी नंतर शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्यास सुरवात केली असल्याची चर्चा केली जात आहे.