सत्ता द्या, एका क्षणात विदर्भाचे वेगळे राज्य स्थापन करू - मायावती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2014

सत्ता द्या, एका क्षणात विदर्भाचे वेगळे राज्य स्थापन करू - मायावती

'महाराष्ट्रात एकछत्री सत्ता द्या, एका क्षणात विदर्भाचे वेगळे राज्य स्थापन करू', असे आश्वासन बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी गुरुवारी येथे दिले. विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मायावती यांच्या भंडारा आणि नागपुरात सभा झाल्या. कस्तूरचंद पार्कवरील जाहीर सभेत बोलताना त्यांनी विदर्भाचे आश्वासन पूर्ण करण्याची ग्वाही दिली. 'अनेक वर्षांपासून विदर्भ मागासलेला आहे. आतापर्यंत राज्य व केंद्रातील राज्यकर्त्यांनी विदर्भाचा कधीही विचार केला नाही. जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. राज्यात सत्ता येताच विदर्भाची निर्मिती करून हे राज्य विकसित करण्यात येईल', असेही त्या म्हणाल्या. 

'आम्ही जाहीरनामा जारी करत नाही. इतर पक्ष आश्वासन पूर्ण न करण्यासाठीच जाहीरनामा प्रकाशित करतात. मतदान जवळ आले असल्याने राज्यकर्ते आणि सत्तेत येण्याचे स्वप्न बघणारे विविध आमिषे दाखवून मतदारांना भुरळ घालतील. तशी हवाही तयार करतील. मात्र, त्याला बळी पडू नका', असे आवाहन करून मायावती यांनी 'अच्छे दिन'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. लोकसभा निवडणुकीत भाजप व मोदी यांनी जाहीरनामा आणि भाषणातून 'अच्छे दिन'चे आश्वासन देत स्वप्न दाखवले. परंतु, पंतप्रधानांनी त्या दिशेने एकही पाऊल उचललेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.मायावती यांनी सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात उत्तरप्रदेशात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. बसपला २००७ मध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर २०१२ च्या निवडणुकीत आमची परत सत्ता येऊ नये म्हणून काँग्रेस, भाजप आणि सपा छुपी हातमिळवणी केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Post Bottom Ad