पर्यटनस्थळांच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली जाणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2014

पर्यटनस्थळांच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली जाणार

मुंबईच्या स्वच्छतेसाठी महापालिका पाच वर्षांचा मास्टर प्लान तयार करत असून पहिल्या टप्प्यात गर्दीची ठिकाणे आणि पर्यटनस्थळांच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. येत्या काळात ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण जागेवरच करण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. 

सार्वजनिक ठिकाणचा कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या १५ हजार कचराकुंड्यांचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव रखडला होता. या प्रस्तावाच्या निमित्ताने मुंबईतील स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला. नगरसेवक निधीतून कचराकुंड्या खरेदीची मागणी नगरसेवकांमार्फत होत असूनही पालिका उपायुक्त प्रकाश पाटील ती उपलब्ध करून देत नसल्याची तक्रार भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. घनकचरा विभागातील विविध प्रस्तावांसाठी अनेकदा टेंडर मागवून पाटील ते रद्द करत असल्याने पालिकेला कचरा कुंड्या खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे कोटक म्हणाले.

Post Bottom Ad