मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2014

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. मतदारांना आपला हक्क बजावता यावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने 15 ऑक्टोबर (आज) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 


13 व्या विधानसभा निवडणूक ऐतिहासिक होत आहे. जवळपास सर्वच 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक पंचरंगी होत आहे. जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्टीतून रुग्णालय, पोलिस प्रशासन, औषध दुकाने आणि अन्य अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहेत. निवडणूक कर्मचाऱयांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात आली आहे. 

सरकारी, निमसरकारी, खासगी आस्थापना आणि प्रतिष्ठाने, मॉल्स, दुकाने, कंपन्यांना सुट्टी देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ज्या कारखान्यांना सुट्टी देता येणार नाही, अशा कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांना दोन तासांची सुट देण्याची सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने औरंगाबादमधील अजिंठा-वेरुळ लेणी, बीबी का मकबरा, पानचक्की अशा पर्यटन स्थळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Post Bottom Ad