नगरमध्ये पुन्हा दलित हत्याकांड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2014

नगरमध्ये पुन्हा दलित हत्याकांड

दलित समाजातील एकाच कुटुंबातील तीन जणांची अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी हत्या केली. त्यानंतर या मारेकरऱ्यांनी तिन्ही मृतदेहांचे तुकडे विहिरीत टाकून दिल्याची अमानुष घटना पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावात घडल्याचे मंगळवारी उघडकीस आले. संजय जाधव (४२), त्यांची पत्नी जयश्री ( ३८) व मुलगा सुनील जाधव ( १९) अशी मृतांची नावे आहेत. या हत्याकांडामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

जाधव यांच्या घरासमोरील अंगणात या तिघांची हत्या करून घरातीलच ताडपत्री व गोणपाटात हे तिन्ही मृतदेह पाचशे फुटांवरील विहिरीपर्यंत फरफटत नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. विहिरीजवळच्या गवतावर; तसेच घराजवळील दगडांवरही रक्ताचे डाग आढळले आहेत. ज्या ठिकाणी हत्या झाली त्या जागेवर बाजरीची चिपाडे टाकली होती. जाधव वापरत असलेली दुचाकी घटनास्थळापासून एक किमी अंतरावर सापडली आहे. रात्री उशिरापर्यंत विहिरीतून मृतदेह काढण्याचे काम सुरू होते.

जवखेडे खालसा गावालगतच्या जाधव वस्तीवर संजय जाधव आपली पत्नी जयश्री व मुलगा सुनील यांच्यासोबत राहतात. सुनील हा मुंबई येथे डेअरीच्या कोर्सला असून, गेल्या गुरुवारी तो गावी आला होता. वस्तीपासून दोन किमीवर असलेल्या त्यांच्या शेतातील घरात ते राहायला गेले होते. मंगळवारी सकाळी त्यांच्या घराचे दार उघडे राहिल्याचे आणि घरात कोणीच नसल्याचे जवळ राहाणाऱ्या हिराबाई वाघ यांच्या लक्षात आले. याची माहिती त्यांनी जाधव यांच्या पुतण्या रवींद्र यांना दिली. 

ते शेतातील घरी आले असता, त्यांना घरात सुनीलचा मोबाइल; तसेच घराच्या दारात रक्ताचे डाग दिसले. जाधव यांच्या सर्व नातेवाईकांनी नगर, पाथर्डी व शेवगाव येथील दवाखान्यांत त्यांचा शोध घेतला. पण त्यांचा पत्ता लागला नाही. ते सर्वजण जाधव यांच्या घरी परतले असता, मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घराजवळील विहिरीत या तिघांचे मृतदेह आढळून आले. दोन मृतदेहांचे दोन तुकडे करून विहिरीत टाकले होते, तर जयश्री यांच्या डोक्यात मार लागल्याचे आढळले.

जवखडे गावावर शोककळा

मृत संजय जाधव हे शेती व्यतिरिक्त गवंडी काम करायचे. त्यांचे गावात कोणाशीही कधीही वाद झाला नव्हता. त्यांच्या हत्येने जवखेडे खालसा गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, रिपाइं नेते रामदार आठवले, चंद्रकांत हंडोरे हे बुधवारी घटनास्थळी भेट देणार आहेत. 

Post Bottom Ad