मुंबई - वाढदिवस म्हटला कि शुभेच्छा आल्या. मित्र-मंडळी, नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. आता नगरसेवकांनाही महापौरांकडू वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रकाव्दारे दिले जाणार आहेत. नगरसेवकांना शुभेच्छा पत्रक पाठविणाऱ्या त्या पालिकेतील पहिल्याच महापौर ठरणार आहेत.
प्रत्येक नागरिक आपला वाढदिवसमोठ्याउत्साहाने साजरा करतो. मग साधेपणाने असो किंवा थाटामाटात असो मात्र मित्र मंडळीकडून , नातेवाईकांकडून, आप्तेष्ठांसह मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे आनंदाची भरती औरच असते. मुंबईतील नगरसेवकांच्या वाढदिवसादिनी आता मुंबईच्या महापौरांकडून शुभेच्छा पत्र पाठविला जाणार आहे. मुंबईत 227 आणि 5 नामनिर्देशित नगरसेवक आहेत. यासर्वांना शुभेच्छापत्र पाठविले जाणार असल्याचे महापौर स्नेहल आंबेकरयांनी सांगितले. पहिला मान शिवसेनेच्या नगरसेविका प्रणिता वाघधरे यांना मिळणार आहे. शुभेच्छा पत्रकांमुळे आपला आनंदव्दुगुणीत होतो, त्यामुळे ही संकल्पना मनात आल्याचे आंबेकर यांनी सांगितले.