लोकसभा निवडनुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार बहुमताने येणार हे जाहीर झाल्या नंतर महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यामध्ये बौद्ध विहाराच्या वादग्रस्त जागेच्या वादावरून संजय निवृत्तीनाथ खोब्रागडे या बौद्ध व्यक्तीला जिवंत पेटविल्याची खळबळजनक घटना १७ मे २०१४ पहाटे गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथे घडली होती. आता पुन्हा महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका संपन्न होऊन निकाल जाहीर झाले आणि भाजपाचे सरकार येणार असे जाहीर होताच नगर येथील जामखेड पाथर्डी गावात संजय जाधव, जयश्री जाधव व त्यांचा मुलगा सुनील जाधव या तिघांचा निर्घुण खून करण्यात आला आहे.
जाधव कुटुंबियांचा खुन इतक्या निर्घुण पणे केला आहे कि या तिघांच्या शरीराचे तुकडे करून टाकण्यात आले आहेत. हा एक बौद्ध समाजाला संदेश आहे. बौद्ध बांधवांवर व इतर मागासवर्गीय समाजावर प्रत्येक अन्याय अत्याचारा विरोधात बौद्ध समाज पेटून उठतो, अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उचलतो यामुळे अन्याय अत्याचारा विरोधात लढणाऱ्या या समाजाला भीतीयुक्त वातावरणात जीवन जगावे म्हणून असे प्रकार केले जात आहेत. बौद्ध समाजाची गेल्या काही वर्षात झालेली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती काही लोकांना पाहवत नसल्यानेही असे प्रकार होत आहेत.
कालचा महार आमच्या समोर खाली डोकं ठेवून चालणारा आज बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्क आणि अधिकारांमुळे बौद्ध धर्माची दीक्षा घेवून ताठ मानेने आपले जीवन जगात आहे. बौद्धांची झालेली प्रगती हीच काही लोकांना पाहवत नाही. बौद्धांनी आपल्या बरोबरीने आल्याचे पाहून अश्या प्रवृत्तीच्या लोकांची पोटदुखी सुरु झाली आहे. या पोटदुखी मधूनच इतकी भयानक हत्याकांडे केली जात आहेत. अशी हत्याकांडे करून बौद्ध समाजात भीती निर्माण करण्याचे कारस्थान सुरु आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या लेखांमधून मी स्पष्ट केले होते कि मानुवाद्यांचा छुपा अजेंडा सुरु आहे. काही अपवाद वगळता बौद्ध समाजाचे खासदार आणि आमदार निवडून येणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. राज्य घटना बदलाची तयारी सुरु आहे. लोकसभा नंतर देशातील राज्य ताब्यात घेतली जात आहेत. लोकसभेतील बहुमताच्या जोरावर राज्यासभाही ताब्यात घेतली जाईल. पण त्या विरोधात आणि बौद्धांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उचलणारा तिथे कोणीही नाही हीच शोकांतिका आहे.
लोकसभा, राज्यसभा, विधिमंडळ या मध्ये बौद्ध बांधवांवर झालेल्या अन्याय अत्याचारा विरोधार आवाज उचलणारे कोणीही राहिलेले नाही.रामदास आठवले यांना रडून रडून भिक मागून एक खासदारकी मिळाली आहे पण ती खासदारकीही भाजपाने दिली असल्याने या मनुवाद्यांच्या पुढ्यात आपले तोंड उघडता येणार नाही अशी परिस्थिती आठवले यांची भाजपाने करून ठेवली आहे. त्यातच आठवले यांना मंत्री पदाची स्वप्ने पडली असल्याने बौद्ध समाजच आठवले यांना आपला नेता मानण्यास तयार नाही. आठवले हे बौद्ध समाजाचा वापर फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी करत असल्याचे लोकांना समजू लागले आहे.
अशीच परस्थिती इतर नेत्यांची आहे. प्रत्तेक रिपब्लिकन पक्षाचा गट कुठल्यातरी मोठ्या पक्षाच्या दावणीला बांधला गेला आहे. यामुळे कोणत्याही नेत्याकडून किंवा गटाकडून समाजाने अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरत आहे. आज समाजातील प्रत्तेकाची बांधव आई बहिण यांची काळजी घेण्याची जबाबदारी समाजातील प्रत्तेकाने उचलण्याची गरज आहे. आज विविध संघटना एकत्र येत आहेत. ठीक ठिकाणी अश्या सामाजिक संघटना राजकीय नेत्यांना बाजूला टाकून आंदोलने करून अन्याय अत्याचाराचा निषेध करत आहेत.
बौद्ध बांधवानी सुद्धा आपल्यातील हेवे दावे बाजूला ठेवून अश्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलण्याची गरज आहे. कोणताही नेता काही अनुचित प्रकार घडल्या नंतर सांत्वन करायला येईल पण अन्याय अत्याचार होत असताना येणार नाही याचा विचार करण्याची गरज आहे. खैरलांजी, संजय खोब्रागडे, जाधव कुटुंबीय असे अजून किती मुडदे पडायची वाट बघायची ? अन्याय अत्याचार आता सहन करू नका. आता गप्प बसून लांबून तमाशे बघायचे सोडून द्यायाल हवे.
बौद्ध समाजातील आपले भाऊ, बहिणी, आई मारली जात आहेत. आज इतर लोकांबरोबर होणारे प्रकार उद्या आपल्या सोबतही होऊ शकतात याचे भान ठेवण्याची गरज आहे. क्रूरतेने होणारे असे प्रकार थांबवण्यासाठी लाखोंच्या संखेने आपली ताकद दाखवावी लागेल. त्यासाठी आपल्या विभागात या प्रकारांचा निषेध करण्याची गरज आहे. आपल्या जिल्ह्यतील जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त, अधीक्ष कार्यालावर मोर्चे काढून याचा जाब विचारा. बौद्धांच्या अंगातील रक्त अजून थंड पडलेले नाही ते अजूनही गरम आहे हे अन्याय अत्याचार करणाऱ्यांना दाखवून द्या.
आमच्या ५०० महार सैनिकांनी पेशव्यांचा खातमा केला होता. या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची गरज असल्यास या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची तयारी ठेवा. आपले पूर्वज शूर होते याची आठवण ठेवा. लढण्यासाठी आपण कधीही मागे हटलेलो नाही. आजही मागे हटायचे नाही. आता लढाई सुरु झाली आहे. शत्रू लपून लपून हल्ले करतो आहे. या शत्रूला खिंडीत पकडून कायदेशीर मार्गाने किंवा वेळ पडल्यास हातात शस्त्र घेवुन चोख उत्तर देण्याची तयारी करण्याची वेळ आली आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment