चित्रपट अभिनेते ऋषी कपूर यांना डेंग्यू झाल्याने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाली हिल येथील ऋषी कपूर यांच्या घरातील फेंगशुईच्या लकी बांबूच्या पाण्यात डासांच्या अळ्या काही दिवसांपूर्वी सापडल्या होत्या, असे किटकनाशक विभागातील एका कर्मचाऱ्याने सांगितले.
सर्वसामान्य मुंबईकर डेंग्यूच्या साथीने हैराण झालेला असतानाच आता उच्चभ्रू वस्तीतील रहिवाशांनाही डेंग्यूची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कपूर यांना गेल्या काही दिवसांपासून ताप होता. त्यांनी केलेल्या वैद्यकीय चाचण्याअंती त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. त्यांना उपचारांसाठी लिलावती हॉस्पिटलमधील ११व्या मजल्यावरील वॉर्डमध्ये दाखल केले आहे. त्यांच्यामध्ये डेंग्यूबरोबर मलेरियाचीही लक्षणे आढळून आल्याचे वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठिक असून येत्या काही दिवसांत त्यांना घरी पाठवण्या येईल.
ऋषी कपूर पाली हिल येथे राहतात. आठ दिवसांपूर्वी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने त्यांच्या घराची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांच्या घरातील फेंगशुईतील लकी बांबूच्या पाण्यात डासांच्या अळ्या सापडल्या. कीटकनाशक विभागातील अधिकाऱ्यांनी ही बाब ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंग यांच्याही निदर्शनास आणली. डासांच्या अळ्यांची घरात पैदास झाल्याचे दिसून येताच कपूर दाम्पत्य हादरून गेले होते. त्यांनी तत्काळ सर्व सफाई केली. त्यानंतर कीटकनाशक विभागातील अधिकाऱ्यांनी पुन्हा दोन दिवसांनी त्यांच्या घराची पाहाणी केली. मात्र त्यावेळी कपूर यांच्या घरात डासांच्या अळ्याची पैदास आढळून आली नव्हती.