‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ अंतर्गत महापौर, आयुक्तांचे श्रमदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2014

‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ अंतर्गत महापौर, आयुक्तांचे श्रमदान


Displaying BMC_0558.jpg

मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्येराबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ अंतर्गत आज महापालिकेच्या २२७ निवडणूक प्रभागात प्रत्येकी एका ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. महापौर स्नेहल आंबेकर, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) विकास खारगेयांनी स्वतः या श्रमदानात सहभागी होत मुंबईकरांना प्रोत्साहित केले.


महापौर स्नेहल आंबेकर यांनी जी/दक्षिण विभागातील जामसांडेकर मार्गावर सार्वत्रिक श्रमदानामध्येसहभाग घेतला. यावेळी नगरसेविका किशोरी पेडणेकर, सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांनीही स्वच्छतेत सहभाग घेतला. महापालिका आयुक्त सीताराम कुंटेयांनी पी/उत्तर विभागातील मालाड (पश्चिम) येथेलिबर्टी उद्यान, एन. एल. मार्ग महापालिका शाळा परिसर, पी/दक्षिण विभागातील गोरेगांव (पश्चिम) मध्ये प्रगति नगर महापालिका शाळा परिसर, लिंक रोड पंपिंग स्टेशन, के / पश्चिम विभागातील अंधेरी (पश्चिम) येथे काजूपाडा सिग्नल ते आदर्श नगर सिग्नल पर्यंतचा मार्ग या ठिकाणी आयोजित सार्वत्रिक श्रमदानात सहभाग घेतला. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) विकास खारगे यांनी ‘ए’ विभागातील कफ परेड, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, पी. डिमेलो मार्ग, महर्षी कर्वेमार्ग, शहीद भगतसिंग मार्ग, जी. एल. सोमाणी मार्ग, प्रकाश पेठेमार्ग या भागात सार्वत्रिक श्रमदाना मध्ये सहभाग घेतला.

स्वच्छ भारत – स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व कार्यालयातील व आस्थापनातील अधिकारी आणि कर्मचारी दर शुक्रवारी सायंकाळी ५.३० ते ७.३० यारितीनेदर आठवडय़ात दोन तास श्रमदानातून आपापले कार्यालय व कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात येत असून त्याचा प्रारंभ देखील झाला आहे. प्रत्येक नागरिकाने देखील आठवडय़ातून दोन तास आणि वर्षातून शंभर तास श्रमदानातून स्वच्छता करणे या अभियानात अपेक्षित आहे. यास्तव, नागरिकांना या अभियानात सहभागी करुन घेत त्याची व्यापकता प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहोचावी यासाठी महापालिकेनेहा उपक्रम सुरु केला आहे.

श्रमदानाचा हा उपक्रम दर शनिवारी राबविण्यात येणार आहे. तथापि, दीपावली उत्सव लक्षात घेता हा उपक्रम या आठवडय़ापुरता दिनांक २५ ऑक्टोबर, २०१४ ऐवजी दिनांक २८ ऑक्टोबर, २०१४ रोजी घेण्यात आला.
मुंबईकर नागरिकांनी श्रमदानातून या स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि स्वच्छ व सुंदर मुंबई साकारण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमास हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Displaying BMC_0656.JPG

Post Bottom Ad