टीबी पेशंटची आत्महत्या करण्यात वाढ झाल्याने कौन्स‌लिरची नियुक्ती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 October 2014

टीबी पेशंटची आत्महत्या करण्यात वाढ झाल्याने कौन्स‌लिरची नियुक्ती

शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करणाऱ्या पेशंटची संख्या वाढू लागल्यामुळे अखेर पालिका प्रशासनाने या हॉस्पिटलमध्ये 'टाटा इस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'च्या सहा प्रशिक्षित कौन्स‌लिरची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेशंटना मोठा मानसिक आधार मिळण्यास मदत होणार आहे. 
शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये या वर्षभरात तीन पेशंटनी आत्महत्या केली. त्याशिवाय अलीकडच्या काळात अन्य दोन पेशंटांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सध्या सरासरी ८०० पेशंटसाठी एकच कौन्सिलर आहे. त्यामुळे पेशंटचे कौन्स‌लििंग होत नव्हते. परिणामी पेशंटमधील वैफल्य वाढत जाऊन आत्महत्यांचे प्रमाण वाढत होते. 

टीबी हॉस्पिटलमध्ये पेशंटवरील उपचारांमध्ये 'सिक्लोसेरीन' हे अँटीबायोटिक्स दिले जाते. यामुळे पेशंटमध्ये नैराश्य येते. तर काही पेशंटमध्ये चिडच‌डिपणा वाढतो. तर काहींमध्ये वैफल्य येते. वैफल्यग्रस्त झालेले पेशंट आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. काही दिवसांपूर्वी एका टीबी पेशंटने आत्महत्या केली. आतापर्यंतची ही तिसरी आत्महत्या आहे. त्यामुळे 'टाटा ‌इस्ट‌ट्यिूट ऑफ सोशल सायन्सेस' या संस्थेच्या २८ कौन्सिलरची टीबीच्या व इतर संसर्गजन्य आजाराबाबत जनजागृतीसाठी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्यातील सहा कौन्स‌लिर शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमधील पेशंटचे कौन्स‌लििंग करतील. तर या टीमपैकी इतर काही कौन्स‌लिर कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, धारावी विभागात जाऊन टीबीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करतील. शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये सहा कौन्स‌लिरची नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचा मोठा फायदा पेशंट तसेच हॉस्पिटलधील कर्मचाऱ्यांनाही होईल असे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र ननावरे यांनी सांगितले.

Post Bottom Ad