मुंबई : विधानसभेच्या बुधवारी झालेल्या मतदानाच्या दिवशी २९९ बोगस ओळखपत्र जवळ बाळगल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोघा कॉलेज तरुणांना अटक केल्याचे प्रकरण आता पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले. आदिल भीम व गुडिया यादव अशी या आरोपींची नावे असून या प्रकरणात आणखी काही साथीदारांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वांद्रे (प.) येथील रंगशारदा येथून या दोघा तरुणांना पोलिसांनी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, मोबाईल फोन, काँग्रेसच्या प्रचाराचे साहित्य तसेच मतदारांची बोगस कार्ड व यादी हस्तगत करण्यात आली. या दोघांनी बोगस मतदान पत्रिकांचा प्रत्यक्ष मतदानासाठी वापर केला होता का? याची चौकशी पोलीस करीत आहेत. यातील एका आरोपीचे संबंध ही निवडणूक लढवणारे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबा सिद्दिकी यांच्याशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवलेल्या प्रिया दत्त यांनाही हा आरोपी ओळखत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.ही बोगस ओळखपत्रे या आरोपींनी कुठे तयार केली? व त्याच्या आधारे त्यांनी बोगस मतदान केले का? याचा तपास चालू आहे. या प्रकरणी मतदान केंद्रातील एका अधिकारी खाडे यांचीही चौकशी चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे प्रकरण नाजूक असल्यामुळे ते पुढील तपासासाठी गुन्हा शाखेकडे देण्यात आल्याची माहिती एका अधिकार्याने दिली.