मुंबई : रेल्वे अपघातांतील बळींना त्वरित वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी मध्य रेल्वेने हवाई रुग्णवाहिकेची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. घटनास्थळावरून या अपघातग्रस्तांना हवाई रुग्णवाहिकेमार्फत इस्पितळात दाखल करण्यात येईल. यासाठी भारतीय हवाई दलाशी मध्य रेल्वेची चर्चा सुरू आहे. यासाठी हवाई दलाच्या एम-१६ या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे.
एम-१६ या हेलिकॉप्टरने घटनास्थळावरून अपघातग्रस्तांना नजीकच्या अद्ययावत रुग्णालयात दाखल करण्यात येईल. विशेषत: मुंबईबाहेरील आणि जवळच्या उपनगरांत एखादा अपघात घडल्यास तेथील जखमींना शहरांतील रुग्णालयात दाखल करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईबाहेरील आणि शहरातील विविध ठिकाणांची मध्य रेल्वे आणि भारतीय हवाई दलाच्या अधिकार्यांनी संयुक्त पाहणी केली आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. भायखळा येथील रेल्वे रुग्णालयानजीक असलेल्या निर्मल पार्क येथील २४0 मीटरचा भूखंड यासाठी निश्चित करण्यात आला आहे.
'कल्याण आणि पनवेल येथील मोकळी मैदाने, शाळांची मैदाने आणि इतर पार्कची पाहणीदेखील केली आहे. ज्या ठिकाणाहून अपघातग्रस्तांची ने-आण करता येईल. या ठिकाणी जे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे, ती जागा एम-१६ हेलिकॉप्टर उतरवण्यास पुरेशी आहे. त्यानंतर अपघातग्रस्तांना नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येईल,' असे रेल्वे अधिकार्यांनी सांगितले. यासाठी जे.जे., सेंट जॉर्ज, केईएम, नायर रुग्णालयांशी चर्चा सुरू आहे. या हेलिकॉप्टरमधून दहा अपघातग्रस्त आणि चार वैद्यकीय कर्मचार्यांची ने-आण करता येणे शक्य आहे. विशेषत: पनवेल आणि कल्याण पलीकडे घडणार्या अपघातांबाबत रेल्वे अधिकार्यांचे विचारविनिमय सुरू आहे. या ठिकाणी त्वरित वैद्यकीय सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. अपघातग्रस्तांची संख्या अधिक असल्यास त्यांना बदनापूर आणि अंबरनाथ येथील रुग्णालयांत उपचारार्थ दाखल करण्यात येईल. त्यानंतरही अपघातग्रस्तांची संख्या वाढत गेल्यास त्यांना शहरातील रुग्णालयांत आणण्यात येईल. यासाठी हार्बर मार्गाला प्राधान्य देण्यात आले आहे. कारण या ठिकाणी रेल्वेचा एकच मार्ग आहे. तसेच या ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्यामुळे अपघातग्रस्तांची रुग्णालयात वाहतूक करणे हे जिकिरीचे काम होऊन बसले आहे.