काका-पुतण्यांचे काय होईल- नरेंद्र मोदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2014

काका-पुतण्यांचे काय होईल- नरेंद्र मोदी

बारामती- बारामतीतील नागरिकांची शेती, जमीन, स्वप्ने सुरक्षित नाहीत. स्वातंत्र्य भारतात ही स्थिती लोक सहन करणार नाहीत. बारामती असो वा महाराष्ट्र आता येथील शेतकरी जागा झाला आहे. काका-पुतण्यांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. 

मोदी म्हणाले, राजकीय पंडितांना काही लक्षात येवो अगर न येवो ही बारामतीच्या सभेतील गर्दी पाहा म्हणजे कळेल की, काका-पुतण्यांचे काय होईल. १५ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांनी मुठभर मीठ उचलून इंग्रजांना हलवून टाकले होते. मात्र, या १५ ऑक्टोबरला मुठीचीही गरज नाही, केवळ एका बोटाने बटन दाबून मतदानाद्वारे बारामतीला स्वातंत्र्य मिळेल. या १५ ऑक्टोबरला तुमच्या तुटलेल्या स्वप्नांना पुन्हा जोडले जाईल. 

बारामती परिसरातील चाळीस गावांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. उजनी धरणाचे पाणी येथील स्थानिक लोकांना उपयोगी येते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटे वाजले आहेत. याचा अर्थ दहा वर्षांत दहापट भ्रष्टाचार केला आहे. येथील सहकारी साखर कारखाने कर्जांत बुडालेले आहेत. त्याच कारखान्यांचे नेतृत्व करणाऱ्यांचे खाजगी कारखान्यांमध्ये करोडो-अब्जांचा नफा होतो. हे कसे होते. त्यामुळे हे विश्वासार्ह नाही. 

गरिबीचे दुःख मी पाहिले आहे. सरकार हे गरिब, मागासलेल्यांसाठी आहे. त्यांना सरकारने हिशेब दिला पाहिजे. मागील पंधरा वर्षांत राज्य सरकारने हिशेब दिला का, असा प्रश्न त्यांनी विचारला.

Post Bottom Ad