मुंबईचा लोकल प्रवास महागणार? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2014

मुंबईचा लोकल प्रवास महागणार?

मुंबई - ‘अच्छे दिना’चे गाजर दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने मुंबईकर लोकल प्रवाशांना भाडेवाढीचा दुसरा दणका देण्याचे ठरवल्याचे वृत्त आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी ४२५ कोटींच्या कामांचे प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला होते.

मात्र, तुमचा खर्च कमी करून आणि स्वत:च्या उत्पन्नातून हे प्रकल्प पूर्ण करा, असे आदेशच रेल्वे बोर्डाने दिल्याचे समजते. त्यामुळे मुंबईकरांवर पुन्हा भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्हे आहेत. उपनगरीय रेल्वेतून कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न मिळते. तरीही रेल्वे बोर्ड मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचे दिसत आहे.
मध्य रेल्वेने २१ ऑक्टोबर रोजी ४२५ कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. त्यात सुरक्षा व नियोजित प्रकल्पांपैकी प्राधान्याने पूर्ण करण्याच्या प्रकल्पांची यादी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी दिली होती. मात्र ‘तुम्ही खर्च कमी करा व स्वत:च्या उत्पन्नातून नियोजित कामे पूर्ण करा’ असे रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेला सांगितल्याचे कळते.
२०१३-२०१४ मध्ये मध्य रेल्वेला ७०० कोटी रुपयांचा तोटा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्यासाठी ६०० कोटींची गरज आहे. जवळपास १३०० कोटी रुपयांची कमतरता भरून काढण्यासाठी भविष्यात लोकलचे भाडेवाढ होण्याची शक्यता रेल्वेचे अभ्यासक करत आहेत. त्यामुळे आधीच भाडेवाढ झाल्याने खचलेल्या मुंबईकरांची नवीन भाडेवाढ झाल्यास कंबर पूर्ण मोडणार असल्याचे रेल्वे अभ्यासक सांगत आहेत.
रेल्वे बोर्डाकडे पाठवलेल्या प्रकल्पांची यादी - प्रकल्प खर्च
विद्युतीकरण : पनवेल-पेण-थळ …….. १०९.६८ कोटी
जासई-जेएनपीटी ……………… १४.४७ कोटी
सीएसटी येथील लांब पल्ल्याच्या
२४ डब्यांच्या गाडय़ांसाठी प्लॅटफॉर्मची
लांबी वाढवणे ……………….. ७१.६२ कोटी
दिवा, मुंब्रा, शिवडी आणि दादर या
स्थानकांमधील पादचारी
पुलांची फेरउभारणी …………….. १५ कोटी
ठाणे- कल्याणमध्ये डिजिटल अ‍ॅक्सेल
काउंटर्स बसवणे ………………. १०.१० कोटी
रेल्वे फाटके बंद करून पूल उभारणे ….. ५२.८७कोटी
सीएसटी, डोंबिवली स्थानकांवर छप्पर … ५.४ कोटी
इतर कामे ………………….. १३० कोटी

Post Bottom Ad