भाजपाला बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान नको आहे. त्यांचे तसे प्रयत्न सुरु आहेत. याआधीही भाजपाप्रणीत सरकार होते परंतू तेव्हा त्यांचे संख्याबळ कमी होते. त्यामुळे भाजपाला संविधान बदलता आलेले नाही. सध्याच्या लोकसभेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता ते संविधान बदलण्याचा अजेंडा जोरात राबवणार आहेत असे गांधी यांनी सांगितले.
संविधान बदलायचे असल्यास राज्यसभा आणि राज्यांमध्ये भाजपाला सत्ता हवी आहे. असे झाल्यास संविधान मोडीत काढले जाईल. भारताचे संविधान महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले असल्याने संविधान आणि महाराष्ट्राचे वेगळे नाते आहे. संविधान वाचवण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्रातील जनतेला पार पाडावी लागेल. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला भाजपाच्या विरोधात मतदान करावे लागेल असे गांधी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या महेश भट व शबनम आझमी यांनी गुजरातची खरी परिस्थिती लोकांच्या व पत्रकारांच्या समोर उघड केली. गुजरातचे गुणगाण गाण्याचे लोकांनी बंद करून मतदान करावे असे आवाहन गांधी यांनी केले आहे.