मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर शहरात शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंग लावण्यात आली. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून या होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिले आहेत.
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर दादा, भाई, ताईंना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील चौकाचौकात, गल्लोगल्ली अनधिकृत फलक, होर्डिंगआणि बॅनर्स लावण्यातआले. शहर विद्रूप करणाऱ्या फलकांवर, होर्डिंग आणि बॅनर्सवर कारवाईचे आदेश उच्च न्यायालायाने पालिकेला दिले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी कारवाई करावी असे सक्तबजावण्यात आले. त्यानंतर तात्पूरत्या कारवाईचा बडगा पालिकेने उगारला. मात्र, निवडणूक संपल्यानंतर राजकीय पक्षातील उमेदवारांनी शुभेच्छा देणारे फलक ठिकठिकाणी लावले. परिणामी, शहराच्या सुंदरतेला बाधा निर्माण झाली. हे फलक ताबडतोब काढण्यात असे आदेश महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे शहरातील लागलेले बॅनर लवकरच काढले जातील असे आश्वासन पालिकेने दिले आहे.