नव्या वर्षात एमआयएमची आता महिला शाखा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2014

नव्या वर्षात एमआयएमची आता महिला शाखा

कट्टर धार्मिक संघटना अशी ओळख असलेल्या ओवेसी बंधूंच्या 'मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन' (एमआयएम) या पक्षाने विधानसभेच्या दोन जागा जिंकून महाराष्ट्राच्या राजकारणात चंचूप्रवेश केला असतानाच, आता नव्या वर्षात पक्षाची पहिली महिला शाखा मुंबईत सुरू होणार आहे. संघटनेमध्ये नवोदित मुस्ल‌मि महिला नेतृत्वाला प्राधान्याने संधी मिळण्याची शक्यता असली, तरीही या शाखेत सर्वधर्मीय महिलांच्या प्रश्नांचा, समस्यांचा विचार केला जाईल, न्याय मिळवून दिला जाईल, असा दावा 'एमआयएम'चे भायखळा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार वारिस युसूफ पठाण यांनी केला आहे. 
महिलांचे आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि महिलांवर होणारे अत्याचार व हिंसा या विषयांना प्राधान्य देऊन सर्व स्तरांतील महिलांची जोडणी या शाखेच्या माध्यमातून केली जाणार आहे. शाखाबांधणीचा पहिला टप्पा मुंबईपासून सुरू होणार असून, राज्यातील मुस्लीमबहुल वस्त्यांमधून महिला नेतृत्व तयार करण्यासाठी याच स्थानिक महिला नेतृत्वाच्या मदतीने जोरकस प्रयत्न केले जाणार आहेत.

वैयक्तिक तसेच सामाजिक पटलावर निर्णय घेण्याच्या अधिकारापासून बहुसंख्य मुस्लीम महिला आजही वंचित आहेत. या परिस्थितीत महिलांसाठी भरीव कार्य करण्याची निकड एमआयएमला वाटते. या स्त्रियांचे प्रश्न हे पुरुषकेंद्री व्यवस्थेमुळे निर्माण झालेले आहे, हे एमआयएमला मान्य असले, तरीही समान धर्मीय स्त्रियांना 'एमआयएम'शी जोडण्यासाठी महिलांची साखळी उपयुक्त ठरेल, असा विश्वास संघटनेस वाटतो.

Post Bottom Ad