शपथविधी सोहळ्यात दलित संघटनांचे धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2014

शपथविधी सोहळ्यात दलित संघटनांचे धरणे आंदोलन

मुंबई - नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील जवखेडा गावात घडलेल्या जाधव कुटुंबाच्या तिहेरी हत्याकांडाबदल राज्यभरात तीव्र आंदोलने छेडण्यात येत आहेत. ३१ ऑक्टोबरच्या शपथविधी सोहळ्यालाही या आंदोलनाची धग बसणार आहे. दलित अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात येणार्‍या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून नव्या मुख्यमंत्र्यांना जातीय अत्याचाराविरोधात कडक कारवाईसाठी निवेदन देण्यात येणार आहे. 


मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भाजपच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला दस्तुरखुद पंतप्रधान नरेद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. अशा वेळेला दलित अत्याचारविरोधी कृती समितीने दलितांच्या अत्याचाराविषयी लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. सायंकाळी ४ वाजता हे आंदोलन होणार असून त्यात दलितांच्या प्रश्‍नावर काम करणार्‍या ३५ संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती समितीचे सुधीर ढवळे यांनी दिली. जास्तीत जास्त संख्येने वानखेडे स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उपस्थित राहून जातीय अत्याचाराविरोधात असलेला रोष सरकारपर्यंत पोहचविणे हा समितीचा उद्देश असून तो शांततापूर्ण मार्गाने करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या आंदोलनात फिरोज मिठीबोरवाला, सुबोध मोरे, समुेध जाधव, संजय शिंदे, ज्योती बडेकर तसेच ‘फेसबुक आंबेडकर राइट’चे आतिश कसबे, किशोेर कर्डक, उत्तम जहागिरदार, सालिम साबुवाला आदी उपस्थित राहणार आहेत.

Post Bottom Ad