मुंबई - जोगेश्वरी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पूर्वेकडील सेटलाइट सोसायटीच्या नवरात्रोत्सवात वायकर यांचा प्रचार सुरू असल्याचे एका महिलेने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले. त्यानंतर एक पथक तिथे गेले तेव्हा ध्वनिक्षेपकावरून "धनुष्यबाणासमोरील बटण दाबून साहेबांना विजयी करा‘ असे आवाहन केले जात असल्याचे दिसले. हे चित्रीकरण केलेली सीडी पोलिस ठाण्यात सादर करण्यात आली. पोलिसांनी वायकर यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे.
Post Top Ad
01 October 2014
Home
Unlabelled
रवींद्र वायकर यांनी केला आचारसंहितेचा भंग
रवींद्र वायकर यांनी केला आचारसंहितेचा भंग
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.