करमाड (जि. औरंगाबाद) :‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खोटे बोलून लोकसभा ताब्यात घेतली. ते महाराष्ट्रावर सूड उगवत असून, राज्यापासून मुंबई तोडण्याची भाषा करीत आहेत,‘ अशी टीका कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी आज (रविवार) केली. करमाड येथे फुलंब्री मतदारसंघाचे उमेदवार डॉ. कल्याण काळे व पैठणचे उमेदवार रवींद्र काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. राणे म्हणाले, की पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आता कमी झाली आहे. पाकिस्तानने तीन महिन्यांत पन्नास गोळीबार केला, तरी केंद्र सरकार काहीही करू शकत नाही. राज्यात मराठी अस्मितेला धक्का पोचविणाऱ्या गद्दारांना धडा शिकवा.
Post Top Ad
05 October 2014
Home
Unlabelled
मोदींनी खोटे बोलून लोकसभा ताब्यात घेतली: राणे
मोदींनी खोटे बोलून लोकसभा ताब्यात घेतली: राणे
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.