रुग्णालयांतील प्रत्येक वॉर्डात फार्मासिस्ट नेमण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2014

रुग्णालयांतील प्रत्येक वॉर्डात फार्मासिस्ट नेमण्याची मागणी

मुंबई - राजावाडी आणि भाभा रुग्णालयात औषधांमुळे झालेल्या रिऍक्‍शनमुळे सुमारे 50 जणांना त्रास झाला होता. महापालिका रुग्णालयांत औषधांची चाचणी होत नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर औषधांमुळे रुग्णांना त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक वॉर्डात फार्मासिस्ट नेमावा, अशी मागणी नगरसेवकांनी आरोग्य समितीच्या बैठकीत केली आहे. 

राजावाडी आणि भाभा रुग्णालयातील घटनांनंतर महापालिका रुग्णालयांत वापरण्यात येणाऱ्या औषधांची चाचणी करण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोणतीही हालचाल केलेली नाही. औषधांमुळे होणारी रिऍक्‍शनची समस्या उद्‌भवू नये आणि रुग्णांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी महापालिका रुग्णालयांत फार्मासिस्टची नेमणूक करावी, अशी मागणी करणारे पत्र नगरसेविका आणि आरोग्य समिती सदस्य डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी आरोग्य समितीकडे केली आहे. 

महापालिका रुग्णालयांत खूपच कमी फार्मासिस्ट आहेत. येथील फार्मासिस्टच्या अनेक जागा रिक्त आहेत. मुंबईत 1 लाख 70 हजार फार्मासिस्ट कामाला आहेत. अनेक नवीन फार्मासिस्ट पदवीधर तयार होत आहेत. त्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेता येईल, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे. प्रशासकीय पातळीवर यासाठी पाठपुरावा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad