चव्हाण, ठाकरे टीमला घरी बसवण्याची काँग्रेसची तयारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2014

चव्हाण, ठाकरे टीमला घरी बसवण्याची काँग्रेसची तयारी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झाल्यास पृथ्वीराज चव्हाण यांना मोठ्या 'शिक्षे'ला सामोरे जावे लागू शकते, असे दिल्लीतील सूत्रांचे म्हणणे आहे. पृथ्वीबाबांसह प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि त्यांच्या टीमलाही घरी बसवण्याची तयारी हायकमांडने केली आहे. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतरही 'स्वच्छ प्रतिमा' या निकषावर काँग्रेस हायकमांडने पृथ्वीराज यांच्यावर विश्वास दाखवला. पृथ्वीराज यांच्याकडे मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यात आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकाही पक्षाने त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्याचे ठरवले. विशेष म्हणजे विधानसभेच्या प्रचारादरम्यान विविध माध्यमांमध्ये ज्या जाहिराती झळकत होत्या त्यातही पृथ्वीराज यांचाच चेहरा पुढे करण्यात येत होता. मात्र या सगळ्यानंतरही राज्यात काँग्रेस नापास होण्याचीच चिन्हे अधिक दिसत आहेत. 


मतदानानंतर घेण्यात आलेल्या जनमत चाचण्याचे अंदाजही काँग्रेसच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळेच पृथ्वीराज यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस हायकमांड महाराष्ट्रातील स्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. रविवारच्या निकालाची प्रतीक्षा आहे. निकाल समोर आल्यानंतर त्यात काँग्रेसचा परफॉर्मन्स लक्षात घेऊन हायकमांड पृथ्वीराज आणि प्रदेश काँग्रेस कमिटीबाबत निर्णय घेईल, असे काँग्रेस वर्तुळातील सूत्रांनी सांगितले. 

Post Bottom Ad