विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदार यादीत नाव असणार्या सर्व नागरिकांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी शैला ए. यांनी केले आहे.
मुंबई शहर जिल्ह्यामधील मतदारांची संख्या २४,५७,0७६ आहे. यामध्ये १३,५९,५९८ पुरुष आणि ११,५७,४0९ महिलांचा समावेश आहे. याशिवाय ६९ इतर मतदारांचा ही यादीत समावेश आहे. मतदार यादीत ओळखपत्र असणार्या मतदारांची टक्केवारी ९१.२९ टक्के आहे. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १0 विधानसभा मतदारसंघ येतात. यंदाच्या राजकीय परिस्थितीमुळे तब्बल १३९ उमेदवार रिंगणात उभे आहेत. यापैकी धारावी १३, शीव कोळीवाडा १५, वडाळा १४, माहिम ९, वरळी १३, भायखळा ११, शिवडी ८, मुंबादेवी १८, कुलाबा १४ आणि सर्वाधिक २३ मतदार मलबार हिल मतदारसंघात उभे आहेत. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये २,५४५ मूळ मतदार केंद्रे आहेत. २६ सहाय्यकारी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
६२ मतदान केंद्रांची वर्गवारी संवेदनशीलमध्ये करण्यात आली आहे., तर २५ मतदान केंद्रे 'व्हलनरेबल' म्हणून घोषित करण्यात आली आहे. एकूण २,५७१ मतदान केंद्रांवर ईसीआयएल कंपनीची एकूण ३,१८२ कंट्रोल युनिट्स व ३,७९७ बॅलेट युनिट अशा एकूण ६,९७९ ईव्हीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून २५ हजार अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकारी व कर्मचार्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या कामचुकार अधिकारी व कर्मचार्यांवर भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१च्या कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.