मुंबई / अजेयकुमार जाधव
१५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी दुकाने, कार्यालये इत्यादी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश शासन निर्णय काढून देण्यात आले असले तरी या कायदा धाब्यावर बसवला गेल्याने कित्तेकांना आपल्या मतदानाचा अधिकार बजावता आला नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
१५ ऑक्टोबरला भर पगारी सुट्टी द्यावी किंवा मतदान करता यावे म्हणून कार्यालयातून मतदानासाठी सोडले जावे असे नियम आहेत. असे असताना बहुतेक कायालये आणि दुकानांनी या नियमांकडे दुर्लक्ष करून आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले होते. या पैकी काहींनी आपल्याला सुट्टी दिली नाही म्हणून कामावर येण्या आधीच सकाळी मतदान केले होते तर काहीना सुट्टी न मिळाल्या मुळे मतदान करता आलेले नाही.
मुंबई मध्ये अश्या दुकाने आस्थापनांवर कारवाही करण्याचे अधिकार मुंबई महानगर पालिकेच्या दुकाने आणि आस्थापना विभागाकडे आहे. याबाबत या विभागाचे अधिकारी गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही ४ पथके नेमली आहेत. हि पथके सगळीकडे पोहचू शकत नाहीत. आम्ही कारवाही करत आहोत. परंतू ज्या ठिकाणी मतदान केले गेले असेल यांच्यावर आम्ही कोणतीही कारवाही करणार नाही असे गोसावी यांनी सांगितले.
जी दुकाने आणि कार्यालये मतदानाच्या दिवशी उघडी ठेवण्यात आली आहेत यावर दिवस भर कारवाही सुरु होती याची आकडेवारी सायंकाळ पर्यंत पत्रकारांना देण्यात आलेली नाही. हि आकडेवारी मिळाल्या नंतरच पालिकेने किती गंभीरतेने कारवाही केली हे समोर येणार आहे.