दादर, अंधेरीत २०% पाणीकपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 October 2014

दादर, अंधेरीत २०% पाणीकपात

मुंबई : तानसा पश्चिम १८०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम ३१ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. त्यामुळे दादर, अंधेरी येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत २० टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. 

के/पूर्व विभाग : मरोळ बस आगार, अंधेरी-कुर्ला मार्ग, जे. बी. नगर, ओम नगर, कोंडीविटा, पश्चिम द्रूतगती मार्ग, तरुण भारत, सहार मार्ग, अंधेरी रेल्वे स्थानक पश्चिम परिसर, मोगरा गावठाण, मरोळ-मरोशी मार्ग ते मिलिटरी मार्ग.जी/दक्षिण विभाग : डिलाइल मार्ग, प्रभादेवी, सिद्धिविनायक मंदिर परिसर, सेनापती बापट मार्ग. जी/उत्तर विभाग : पोर्तुगीज चर्च, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, आगाशे पथ. अंधेरी पूर्व येथील सेव्हन हिल परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.

Post Bottom Ad